मेरा भारत महानना स्वाभिमान आहे
ना अभिमान आहे
प्रत्येकाच्या मनात
नुसतीच घाण आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
हि जात आहे
तो वर्ण आहे
हा पंथ आहे
तो धर्म आहे
चोहीकडे विषमतेचे
हे थैमान आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
गरिबी आहे लाचारी आहे
भ्रष्टाचार अन बेरोजगारी आहे
भविष्य सगळ्यांचे
सगळे भयाण आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
ना गांधी ना नेहरू
ना सुभाषचंद्र आहे
ना भगतसिंह आहे
ना बाबासाहेब आहे
आज जे नेते आहे
सर्व बेईमान आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
चौकात भिकारी आहे
कार्यालयात अधिकारी आहे
संसदेत बसले आमुचे पुढारी आहे
प्रत्येकाच्या हातात
जनतेची मान आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
जो बदमाश आहे जो चोर आहे
जो हरामखोर आहे
तो थोर आहे
मी प्रामाणिक आहे
पण लहान आहे
मग मी कसे म्हणावे
माझा भारत महान आहे ?
जर प्रत्येकाची शान आहे
जर प्रत्येकाला मान आहे
प्रत्येकाला इथे जर
मिळते वरदान आहे
तर प्रत्येक जन म्हणेल
माझा भारत महान आहे
माझा भारत महान आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा