सोमवार, ९ एप्रिल, २०१२

dikshabhumi

दीक्षाभूमी 


वर्षानुवर्ष
धर्म-संस्कृती
रूढी-परंपरेच्या नावाखाली
गुलामगिरीच्या शृंखलेत जखडलेल्या
दिन दलित अस्पृश्यांना
तुझ्याच पवित्र मातीत
भीमान दाखविला
मुक्तीचा मार्ग
आणि नऊ कोटी मुखातून
निनादू लागला
स्वतंत्र, समता आणि बंधुत्वाचा
महामंत्र
बुद्धं सरणं गच्छामि
धम्मं सरणं गच्छामि
संघं सरणं गच्छामि
म्हणून ....
हे दीक्षाभूमी
तू आम्हाला मातृभूमी इतकीच
प्रिय आहे










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा